Wednesday, November 19, 2014

पंचतुंड नररुंडमालाधर पार्वतीश आधी नमितो ||
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपती मग तो ||पंच||धृ||
कालिदास कविराज विरचित हे ,गाती शाकुंतल रचितो
जाणुनिया अवसान नसोनी महत्कृत्यभर शिरी घेतो
ईशवराचा लेश मिळे तरी मूढ यत्न शेवटी जातो
या न्याये बलवत्कवी निजवाक्य पुष्पी रसिकार्चन करितो ||पंचतुंड नर ||

शाकुंतल (३१-१०-१८८०)


संगीत-बळवंत पांडुरंग किर्लोस्कर 
राग-खमाज
ताल-धुमाळी
चाल-जय जय श्रीरमणा भयहरणा

Saturday, November 15, 2014

नाट्यगीते

मर्मबंधातली ठेव ही प्रेममय|
ठेवी जपोनी सुखाने दुखवी जीव||

ह्र्द्यांबुजी लिन लोभि अति हा|
मकरंद ठेवा लुटण्यासी आला|
बांधी जिवाला सुखाशा मनी||

संगीतः वझे बुवा
नाटकः संन्यस्त खङ्ग
गायकः दिनानाथ मंगेशकर
रागः पटदीप
तालः त्रिताल